आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस दर वर्षी नऊ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भ्रष्टाचाराच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेने अधिकाधिक जागरूक झाले पाहिजे, तरच सुसंस्कृत समाज आणि सशक्त लोकशाही देश निर्माण होऊ शकतो, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय बळकटीकरणासाठी आणि या विषयाबद्दल जागरूकता करण्यासाठी आणि भ्रष्टाचारविरोधी धोरणे अमलात आणण्याच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.
भ्रष्टाचारामुळे संस्थांवरील विश्वास कमी होतो. अर्थव्यवस्था कमकुवत होते. सामाजिक विषमता वाढते. त्यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या प्रगतीत अडथळा येतो. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका देशातील सामान्य नागरिकाला बसतो. जागरूकता वाढवणे आणि बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने अनेक लोकमोहिमा, चर्चा आणि पुढाकार घेणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोध दिवस जगभरातील लाखो लोकांना लाचखोरी, फसवणूक आणि सत्तेच्या दुरुपयोगाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो.

भारतातील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदे :-

  • भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ : लोकसेवक आणि लाच देणाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी भ्रष्टाचार आणि दंडाची व्याख्या करतो.
  • भारतीय न्यायसंहिता, २०२३ : भ्रष्टाचार आणि लाचखोरीशी संबंधित विविध तरतुदी आणि सुधारणांचे आधुनिकीकरण.
  • लोकपाल आणि लोकायुक्त कायदा, २०१३ : भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींचे निराकरण आणि सार्वजनिक उत्तरदायित्व सुनिश्चित.
  • व्हिसलब्लोअर्स संरक्षण कायदा, २०१४ : भ्रष्ट व्यवहारांबद्दल माहिती देणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण करून पारदर्शकतेला प्रोत्साहन.

(संकलित माहिती)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *