१८५७चे युद्ध म्हणजे पहिला स्वातंत्र्यलढा होता. त्यामध्ये आपल्या असीम शौर्याने रण गाजवलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज (१९ नोव्हेंबर) जयंती. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील कोलधे हे त्यांच्या माहेरचे, तर त्याच तालुक्यातील कोट हे त्यांच्या सासरचे मूळ गाव. लक्ष्मीबाईंची शौर्यगाथा अनेकांनी गायली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात शाहीर विनता जोशी याही आपल्या कार्यक्रमातून झाशीच्या राणीवरचा पोवाडा अप्रतिमपणे आणि जोशपूर्ण पद्धतीने सादर करतात. या पोवाड्याची रचना नाशिक येथील शिक्षिका श्रीमती कुमुदताई अभ्यंकर यांनी केलेली आहे. काल (१८ नोव्हेंबर) दापोली (जि. रत्नागिरी) येथे विनता जोशी यांनी सादर केलेल्या पोवाड्याची ही झलक...