जीवनाचे सार सांगणारी श्रीमद्भगवद्गीता

आज (मार्गशीर्ष शुद्ध एकादशी) गीता जयंती. त्या निमित्ताने…

जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा ग्रंथ म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता.’ सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील शुक्ल एकादशीचा दिवस गीता जयंती असे मानले जाते. इतक्या वर्षांनंतरही गीतेचे महत्त्व कायम आहे. गीतेतील आध्यात्मिक ज्ञानाने जगभरातील लाखो जणांचे आयुष्य उजळून टाकले आहे. हा निव्वळ एक धर्मग्रंथ नाही, तर आनंदाने जीवन जगण्याचे सार त्यात सांगितलेले आहे. विश्वकल्याणाच्या उदात्त हेतूने गीतेची रचना झाली आहे. मानसिक अस्वस्थता, विकृती यांचा आजच्या जगात कडेलोट झालेला असताना गीतेतील मार्गदर्शन यापुढील काळात खूप महत्त्वाचे ठरणार आहे. भारताने जगाला दिलेला अद्भुत संदेश म्हणजेच भगवद्गीता.

काय सांगते भगवद्गीता आपल्याला?

● विद्या प्राप्त करावयाची असेल, तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत.
● आपल्या कर्माच्या फळांची अपेक्षा आपण न करणे हेच इष्ट आहे.
● आपले कार्य ईश्वरचरणी अर्पण केले पाहिजे.
● जीवनयात्रेचा आनंद कोणतीही अपेक्षा न करता उपभोगायला गीता शिकवते.
● निःस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उद्धाराची पहिली पायरी आहे.
● क्रोधामुळे संभ्रम होतो. संभ्रमामुळे स्मरणशक्ती जाते. स्मरण शक्ती गेल्याने विवेकबुद्धी नष्ट होते आणि विवेकबुद्धी नष्ट झाल्याने विनाश होतो.

गीतेतील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व वेगळे आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गीतेत आहे.
● अध्याय पहिला : अर्जुनविषादयोग
● अध्याय दुसरा : सांख्ययोग
● अध्याय तिसरा : कर्मयोग
● अध्याय चौथा : ज्ञानसंन्यासयोग
● अध्याय पाचवा : कर्मसंन्यासयोग
● अध्याय सहावा : आत्मसंयमयोग
● अध्याय सातवा : ज्ञानविज्ञानयोग
● अध्याय आठवा : अक्षरब्रह्मयोग
● अध्याय नववा : राजविद्याराजगुह्ययोग
● अध्याय दहावा : विभूतियोग
● अध्याय अकरावा : विश्वरूपदर्शनयोग
● अध्याय बारावा : भक्तियोग
● अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
● अध्याय चौदावा : गुणत्रयविभागयोग
● अध्याय पंधरावा : पुरुषोत्तमयोग
● अध्याय सोळावा : दैवासुरसंपद्विभागयोग
● अध्याय सतरावा : श्रद्धात्रयविभागयोग
● अध्याय अठरावा : मोक्षसंन्यासयोग

(संकलित माहिती)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *