संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९४८मध्ये मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारला. त्या दिवसाच्या आठवणीप्रीत्यर्थ १० डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा केला जातो. प्रत्येक मनुष्याला भेदभाव न करता, शांती आणि सुरक्षिततेत जगण्याचा आणि भरभराटीचा अधिकार आहे.
मानवी हक्क कोणते आहेत, ते पाहू या –
- सर्व मानव जन्मतः स्वतंत्र आहेत. त्यांना समान प्रतिष्ठा आणि अधिकार आहेत.
- सर्वांना नमूद केलेले सर्व हक्क आणि स्वातंत्र्ये मिळण्याचा अधिकार आहे, वंश, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मत, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूळ, मालमत्ता, जन्म किंवा इतर दर्जा असा कोणताही भेदभाव न करता…
- प्रत्येकाला जीवन, स्वातंत्र्य आणि वैयक्तिक सुरक्षिततेचा अधिकार आहे.
- कोणालाही गुलामगिरीत ठेवता येणार नाही.
- कोणालाही छळ किंवा क्रूर, अमानुष किंवा मानहानिकारक वागणूक किंवा शिक्षा दिली जाणार नाही.
- प्रत्येकाला कायद्यासमोर स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे.
- कायद्यासमोर सर्व समान आहेत आणि कोणत्याही भेदभावाशिवाय कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा सर्वांना अधिकार आहे.
- संविधानाने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या कृत्यांसाठी सक्षम राष्ट्रीय न्यायाधिकरणांकडून प्रभावी उपाय शोधण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
- कोणालाही मनमानी अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार केले जाणार नाही.
- प्रत्येकास त्याचे हक्क आणि कर्तव्ये आणि त्याच्यावरील कोणत्याही फौजदारी आरोपाचे निर्धारण करण्यासाठी स्वतंत्र आणि निःपक्षपाती न्यायाधिकरणामार्फत सार्वजनिक सुनावणी घेण्याचा, पूर्ण समानतेचा अधिकार आहे.
(संकलित माहिती)




लेख छान व माहितीपूर्ण वाटला.