अहिल्यानगरमधील प्रगत विद्यालयातील अमृत वर्गात विद्यार्थ्यांचा उत्साहाने सहभाग

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत अमृत वर्ग घेण्यात आला. अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी हा अमृतवर्ग घेतला. या वर्गात बुद्धीला चालना देणारे खेळ घेण्यात आले. प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमधून ४/७ खेळ घेतल्यानंतर त्यामधून शेवटी एक विजयी विद्यार्थी निवडण्यात आला. त्याला बक्षीस देण्यात आले. या वर्गात गीते म्हणण्यात आली, तसेच प्रेरणादायी घोषणाही देण्यात आल्या.

पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पंडित आणि शिक्षक वर्गाने यासाठी उत्तम सहकार्य केले. विशेष म्हणजे सर्व शिक्षकांनीही यात सहभाग घेतला. अमृत वर्ग आवडल्याची प्रातिनिधिक भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त झाली. त्यांनी आनंदाने, उत्साहाने वर्गातील सर्व उपक्रम केले. त्यावरूनच त्यांना हा वर्ग आवडल्याचे स्पष्ट झाले.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवता येतील, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/mahaamrut_official/profilecard/?igsh=MW04OHNnamxweXZlbA==
फेसबुक : https://www.facebook.com/share/1CGYUSjznh/?mibextid=qi2Omg

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *